-
ग्रामपंचायत विभाग
प्रशासन विभाग
 
वित्त विभाग
 
ग्रामपंचायत विभाग
 
समाजकल्याण विभाग
 
कृषि विभाग
 
आरोग्य विभाग
 
पशु संवर्धन विभाग
 
शिक्षण विभाग
 
महिला व बालविकास विभाग
 
बांधकाम विभाग
 
पाटबंधारे विभाग
 
पाणीपुरवठा विभाग
 
पुरस्कार
 
शोधा

विभागाचे नाव

ग्रामपंचायत विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम

सहाय्यक गटविकास अधिकारी/विस्तार अधिकारी (ग्रा.प.)

विभागाचा दुरध्वनी क्रमांक

०२५२५ – २५४९५७

विभागाचा ईमेल

bdopalghar@gmail.com

या गटात एकुण 133 ग्रामपंचायती असुन त्यापैकी ग्रुप ग्रामपंचायती 52, स्वतंञ ग्रामपंचायती 80 व 1 ग्रामदान मंडळ आहे. एकुण ग्रामपंचायत सदस्य 1239 त्यापैकी स्त्री सदस्या 434 व पुस्र्ष सदस्य 805 आहेत.एकुण 133 ग्रामपंचायत सरपंच असुन त्यापैकी स्त्री सरपंच 83 व पुस्र्ष सरपंच 50 आहेत.

ग्रामपंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान
योजनेचे स्वरुप माहिती
जन सुविधा योजने अंतर्गत
(अ) ग्रामिण भागात दहन/ दफन भुमीची व्यवस्था करणे त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे दहन/दफन भुमी भुसंपादन,चबुत-यांचे बांधकाम,पोहोच रस्ता,गरजे नुसार कुंपण व भिती घालणे, विद्युतीकरण, आवश्यकते नुसार विद्युत दाहिनी, पाण्याची सोय, स्मृती उद्यान, स्मशान घाट जमिन सपाटीकरण व तळफरशी
(ब) ग्रामपंचायत भवन/ कार्यालय बांधकामे. यात ज्या गावांमध्ये ग्रा.प.इमारत नाही अश्या ठिकाणी सदर योजने अंतर्गत नवीन इमारत बांधकाम प्राधान्याने हाती घेण्यात यावे. या शिवाय जुन्या पडझड झालेल्या ग्रा.प. इमारतीची पुर्नरबांधणी अथवा विस्तार करणे, इमारती भोवती कुपंण घालणे, आवारामध्ये वृक्षारोपण करणे परिसर सुधारणा करणे

योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.प. मार्फत घेण्यात यावी.
२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
५) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल.
६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा
७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
९) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावा सह सरपंच व ग्रामसेवक/ग्रा.वि.अ यांचे स्वक्षरिने प्रस्ताव ग्रा.प.विभाग पंचायत समिती,पालघर कडे सादर करण्यात यावा.


मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान पुरविणे
योजनेचे स्वरुप माहिती
मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत बाजारपेठ विकास, सार्वजनिक दिबाबत्तीची सोय, बागबगीचे, उद्याने तयार करणे, अभ्यासकेंद्र, गांवअंतर्गत रस्ते करणे व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाल्याचे बांधकाम करणे.
योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) या योजने अंतर्गत ग्रा.प. ने आराखडा तयार करुन त्यास ग्रामसभेची प्रशासकिय मान्यता घ्यावी. त्यानंतर गटविकास अधिकारी यांचे मार्फत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांची प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी.
२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
५) जिल्हयातील ग्रा.प.चा प्राधान्य क्रम ठरविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन मंडळाकडे असेल ज्या ग्रा.प.ची लोकसंख्या ५००० च्या वर आहेत व ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत सहभागी होवुन त्या योजनेच्या निकषाची पुर्तता केली असेल त्यामधुनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरविल.
६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा
७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
९) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावा सह सरपंच व ग्रामसेवक/ग्रा.वि.अ यांचे स्वक्षरिने प्रस्ताव ग्रा.प.विभाग पंचायत समिती,पालघर कडे सादर करण्यात यावा.

मा.लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत रस्ते गटारे व अन्य मुलभुत सुविधा पुरविणे
योजनेचे स्वरुप माहिती
मुलभुत सुविधा योजने अंतर्गत गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा, दहनभुमी व दफनभुमीची सुधारणा करणे, संरक्षकभिंत ,ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडी बाजारासाठी सुविधा, गावांमध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण करणे.
योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
२) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
३) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
४) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा
५) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्याबाबत दाखला प्रमाणपत्र
६) सदर योजने अंतर्गत काम सुचविणे बाबत लोक प्रतिनिधी यांचे शिफारस पत्र
७) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
८) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प.पालघर कडे सादर करण्यात यावा.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)
स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) काय आहे ?
हा प्रकल्प लोकांनी स्वतःकरीता राबवायचा असून त्याची अंमलबजावणीही त्यांनीच करावयाची आहे. लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण व्हावी हा यामागील प्रमुख उददेश आहे. उघडयावर शौचाला जाण्याच्या सवयीमुळे पाणी दूषीत होवून अनेक साथीचे रोग होतात त्यांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदीन जीवनावर होतो. तसेच आर्थिक परिस्थिती ढासळते. या सर्व त्रासापासून ग्रामीण भागातील व्यक्तीची सुटका व्हावी म्हणून शासनाने ग्रामीण भागातील जनतेकरीता शौचालय, अंगणवाडी, बालकांकरीता स्वच्छतागृह, शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मागणी प्रमाणे २५ विद्यार्थ्र्या मागे एक शौचालय व २ मुतार्‍या तसेच मुलींकरीताही एक शौचालय व २ मुतार्‍या अशा प्रकारे बांधकाम करावयाचे आहे. हा मुळ उद्येश समोर ठेवून सर्वांना स्वच्छ व निरोगी जीवन प्राप्त करण्याकरीता परिसर स्वच्छतेसंबंधी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे म्हणजेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) होय.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)घटक आणि कार्य
१) माहिती शिक्षण आणि संवाद कामे
२) ग्रामीण स्वच्छता साधनसामुग्री दुकान
३) कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम
४) सार्वजनिक स्वच्छतागृहे
५)सांडपाणी व घनकचरयाचे सुयोग्य व्यवस्थापन
६) शालेय स्वच्छता आणि आरोग्य विषयक शिक्षण अंगणवाडी व शालेयस्वच्छता गृहासाठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द    करण्यात आली आहे. (दि. ४/४/२००६ च्या शासन परिपत्रकानुसार)
६) शालेय/अंगणवाडी/वैयक्तिक शौचालय (अनुदान विभागणी खालीलप्रमाणे)
अभियानाची प्रमुख उद्यीष्टे 
१) देशाच्या ग्रामीण भागातील जीवनमानाची गुणवत्ता उंचावणे
२) देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रमाची व्यापकता वाढविणे
३) जाणीव जागृती आणि आरोग्य शिक्षण यातून स्वच्छतेच्या सुविधांची मागणी निर्माण करणे
४) देशाच्या ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडयातून स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणे. तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक शिक्षण देणे व स्वच्छतेच्या सवयी लावणे.